Thursday , March 5 2026
Breaking News

भाजप रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सभा 29 व 30 रोजी बेळगावात

Spread the love

 

बेळगाव : भाजप रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा येत्या 29 व 30 जानेवारी रोजी बेळगावात होणार आहे. अशी माहिती भाजप रयत मोर्चाचे राज्य प्रभारी आणि पक्षाचे राज्य प्रधान कार्यदर्शी एन. रवीकुमार यांनी दिली. बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राष्ट्रीय कार्यकारिणीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय संघटना प्रधान कार्यदर्शी बी. एल. संतोष यांच्यासह माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती एन. रवीकुमार यांनी यावेळी दिली.
पक्षाच्या वतीने दरवर्षी दोनदा राष्ट्रीय कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात येते. यंदा रयत मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी बेळगावात आयोजित करण्यात आली आहे. या सभेप्रसंगी शेतकरी बंधूंशी संबंधित संवाद कार्यक्रमासह मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. कळसा भंडूरा योजनेस हिरवा कंदील दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी राज्य रयत मोर्चाचे अध्यक्ष राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शशी कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष दुंडाप्पा, रयत मोर्चा अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी, महानगर रयत मोर्चा अध्यक्ष कल्लाप्पा शहापूरकर, माध्यम प्रमुख शरद पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *