विजयपूर : हास्याचे हलवे, तीळ गुळाची खैरात लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात… चला सयांनो संस्कृती जपू म्हणत भावसार क्षत्रिय महिला मंडळाच्या वतीने भावसार समाज कार्यालयात हळदी कुंकु व वाण वाटत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम भावसार समाजाची कुलदेवता हिंगलाल मातेचे पूजन केले गेले.
याप्रसंगी बोलताना महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पद्माताई इजंतकर म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी अग्रेसर राहून महिला स्वावलंबी बनणे गरजेचे असून, समाजाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांना एकत्रित करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, आपली मुले, आपले संसार याच बरोबर आपला स्वाभिमान राखत समाजाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
सौ. रूपा हिबारे यांनी महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीचे महत्व सांगणारे भाषण केले.
सुवासिनीनीं सुगड्याचे वाण म्हणून स्टीलचे ताट तसेच अशोक झिंगाडे यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ कुंकवाचा करंडा वाण म्हणून वाटप करण्यात आले. जमलेल्या सुवासिनी पैकी सौ. मंजुळा सुलाखे यांनी स्त्रियांची महती सांगणारे मनोगत व्यक्त केले. सौ. अश्विनी मिरजकर आणि सौ. गीता मिरजकर यांनी भक्तिगीते सादर केले. तर सौ. कृष्णाबाई झिंगाडे यांनी कन्नड भक्तीगीत गायण केले.
सौ. रुपा हिबारे आभार प्रदर्शन करताना म्हणाल्या,
सर्व महिलांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यास महिला मंडळाला सहकार्य केले. तसेच महिला मंडळाच्या प्रेमळ आदरातिथ्याने जमलेल्या सर्व सुवासिनींच्या हृदयाला स्पर्श झाला. त्यासाठी सर्व समाज्याच्या वतीने त्यांचेही आभार मानले.
या प्रसंगी महिला मंडळाच्या सौ. शैला महिंद्रकर
सौ. बिना नवले, सौ.लक्ष्मी तेलकर, सौ. नंदा पुकाळे
सौ. निर्मला सुलाखे, सौ. रुपाली हंचाटे, लीला बासुतकर , सौ. राजश्री हिरास्कर यांच्यासह समाज भगिनी उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta