अथणी : प्रेमभंग झाल्याने नैराश्येतून एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अथणी तालुक्यातील तावंशी गावातील 21 वर्षीय तरुणीला प्रियकराने लग्नास नकार दिल्याने कीटकनाशक प्राशन करून तरुणीने आत्महत्या केली आहे. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
21 वर्षीय तेजस्विनी गंगाप्पा गुजर हिने आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेजस्विनी नामक तरुणीशी असिफ देसाई नावाच्या तरुणाचे प्रेमसंबंध होते. तरुणीने लग्नासाठी विचारणा केली असता सदर तरुणाने लग्नास नकार दिला. त्यामुळे नैराश्येतून तेजस्विनी गुजर हिने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे.
तेजस्विनी आणि असिफचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. असिफ याआधी एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला होता. सध्या तो जामिनावर बाहेर होता असे सांगण्यात येते. याप्रकरणी तेजस्विनीच्या घराच्या लोकांनी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अथणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta