गोकाक : गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) यांचे शुक्रवारी अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी गोकाक पोलिसांत केली होती. पण आज त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी राजेश झंवर (53) हे शुक्रवारी सायंकाळी ते सहाच्या सुमारास डॉक्टरांकडे जावून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्याआधी डॉक्टरांशी त्यांचे मोबाईलवरून सहावेळा संभाषण झाले होते.
मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर राजेश यांचा मोबाईल बंद झाला. शिवाय ते शनिवारी सायंकाळपर्यंत घरी परतले नाहीत, यामुळे त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार राजेश यांच्या पत्नी नीता यांनी पोलिसांत केली आहे. त्यांनी सदर डॉक्टरवर अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. व्यापारी झंवर आणि सदर डॉक्टर यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होता. त्यातूनच त्यांचे मोबाईलवरून वारंवार संभाषण चालले होते. डॉक्टरांना भेटण्यासाठीच राजेश घराबाहेर पडल्यानंतर 24 तासानंतरही न परतल्याने त्यांचे अपहरण करून खून केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.बेळगाव-गोकाक : गोकाक शहरामधून शुक्रवारी सायंकाळी व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी गोकाक पोलिसांत केली होती. पण आज रविवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या करण्यात आल्याचे समजते. राजेश / राजू झंवर (वय 53) हे गोकाकमधील होलसेल किराणा व्यापारी असून शुक्रवारी सायंकाळी ते सहाच्या सुमारास डॉक्टरांकडे जावून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्याआधी डॉक्टरांशी त्यांचे मोबाईलवरून सहावेळा संभाषण झाले होते. कोळवी येथील पाण्याच्या कॅनलमध्ये त्यांच्या मृतदेहाचा शोध सूरु आहे.
आता पोलिसांनी तपास केला असता हत्या झाल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. त्यांची दुचाकीही सिटी हेल्थ केअरजवळ उभी आहे. राजू आणि सिटी हेल्थ केअरचे डाॅ. सचिन शिरगावी यांच्यातील बिझनेस डील ही पहिली गोष्ट समोर आली. शुकवारी 6 वाजता घरातून बाहेर पडल्यानंतर राजेश यांचा मोबाईल बंद झाला. शिवाय ते शनिवारी सायंकाळपर्यंत घरी परतले नाहीत, यामुळे त्यांचे अपहरण झाल्याची तक्रार राजेश यांच्या पत्नी नीता यांनी पोलिसांत केली आहे. त्यांनी सदर डॉक्टरवर अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. व्यापारी झंवर आणि सदर डॉक्टर यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होता. त्यातूनच त्यांचे मोबाईलवरून वारंवार संभाषण चालले होते. डॉक्टरांना भेटण्यासाठीच राजेश घराबाहेर पडल्यानंतर 24 तासानंतरही न परतल्याने अपहरणाचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला होता. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta