Thursday , March 5 2026
Breaking News

समिती शिष्टमंडळाने घेतली खा. सुप्रिया सुळे यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने काल सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. यावेळी येत्या मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी नियोजित ‘मुंबई चालो’ मोर्चा आणि महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादा संदर्भातील विविध ताज्या घडामोडी आणि बेळगाव शहरातील महिला मेळाव्याबद्दल चर्चा केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली खा. सुप्रिया सुळे यांची सिल्वर ओक इस्टेट मुंबई येथे भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, ऍड. एम. जी. पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व इतर पदाधिकारी यांचा समावेश होता.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *