विविध विभागासाठी मुबलक निधी
बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी मुबलक निधी तरतूद केल्यामुळे हा एक लोकप्रिय अर्थसंकल्प ठरल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली.
शिक्षणासाठी ३,७९,५६० कोटी देऊन बजेटमध्ये 12 टक्के निधी शिक्षणासाठी राखीव ठेवला आहे. जलसंपदा विभागासाठी 22,854 कोटी रुपयांची तरतूद करून ७ टक्के निधी राखीव ठेवला आहे. ग्रामीण विकासासाठी 20,494 कोटी (अर्थसंकल्पाच्या 6 टक्के) आणि शहरी विकासासाठी 17,938 कोटी राखीव ठेवला आहे.
महसूल विभागासाठी 15,943 कोटी व आरोग्य विभागासाठी 15,151 कोटी निधी राखीव ठेवला आहे. तसेच आरोग्यासाठी बजेटमध्ये 5 टक्के राखीव आहे. तसेच खानापूरसाठी सामुदायिक आरोग्य केंद्र.
अंगणवाडी, आशा सेविकांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय स्वागतर्ह आहे. 1000 वरून 1500 पर्यंत शाळा-महाविद्यालयीन मुलींना मोफत बस पास देण्याची घोषणा मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली आहे. यामुळे हा अर्थसंकल्प युवापर असल्याचे डॉ. सरनोबत यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची रक्कम 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 25 हजार कोटींचे कर्ज. खानापूरला सामुदायिक आरोग्य केंद्र देण्यात आले आहे. कित्तूर कर्नाटक विकास मंडळाने घोषणा केली आहे.
चालू वर्षात 10 हजार. अतिरिक्त अनुदान, तीर्थहळ्ळी येथील कृषी संशोधन केंद्रासाठी 10 कोटी रुपये, कृषी आणि फलोत्पादनासाठी 9,456 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली असून सर्व घटकांच्या कल्याणासाठी दूरदर्शी अर्थसंकल्पाचा अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta