बेळगाव : उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवार दि. ६ मार्च पासून सुरुवात होणार आहे. सदर वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पार पाडण्यात येणार असून सकाळी ६.३० वाजता महाआरती नंतर संपूर्ण गावात देवीची सवाद्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
सप्ताह काळात श्री मळेकरणी परिसरात होणाऱ्या यात्रा स्थगित केल्या जातात. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. यादरम्यान श्री मळेकरणी देवीचा मुखवटा देवीला चढविण्यात येतो. संपूर्ण वर्षभर देसाई बंधूंच्यावतीने श्री मळेकरणी देवीची पूजा केली जाते. मात्र होळी पौर्णिमेला श्री मळेकरणी देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सप्ताहाची सांगता रविवारी महाप्रसादाने होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वार्षिकोत्सव समितीने केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta