बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व कमी खर्चात त्यांच्यावर औषध उपचार व्हावेत. यासाठी बेळगाव येथील विजय हॉस्पिटल व होनगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरात करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, डॉ. सोमशेखर व डॉ. उमेश शिंदोळकर, यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅल्शियम आजार, पित्ताशय, अशा विविध आजारांवर मोफत तपासणी, औषधोपचार करण्यात आले. शिबिरामध्ये सुमारे पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यावेळी सुनील जाधव म्हणाले, समाजातील गरजू लोकांना उपचाराचे दर परवडत नसल्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन रवी पाटील यांच्याकडून बेळगाव शहर व उपनगरात आरोग्य शिबीराचे अयोजन करण्यात येत आहे. येत्या पुढील काही दिवसात विविध भागात सकाळी 7 ते 9 या वेळेत शिबीर सुरू राहणार आहे. या अंतर्गत दररोज पाचशे रुग्णांची तपासणी होणार आहे. शिबिरात सहभागी होण्यास विविध भागांतील युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रवी पाटील यांना विजय हॉस्पिटलच्या कार्यालयात संपर्क साधून रितसर आपल्या भागातील वेळ व तारीख नोंदणी करावी, असे आवाहन सुनील जाधव यांनी केले
यावेळी किरण एस. सांबरेकर, किसन रेडेकर, किरण एस. सिंडरेला, शिद्रायसह अन्य गल्लीतील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta