बेळगाव : बिजगर्णी ग्रामस्थ कमिटीच्या अध्यक्ष पदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वसंत अष्टेकर, सेक्रेटरी विष्णू मोरे तर खजिनदार पदी कल्लाप्पा अष्टेकर यांची बिन विरोध एकमताने निवड करण्यात आली आहे.
ही निवड म्हणजे गावच्या प्रत्येक नागरिकांना प्रतीष्ठीचा विषय होता. गेल्या एक वर्षा पासून या निवडणुकीसाठी संपूर्ण गाव राजकारणात धगधगत होते. गावचा सामुहीक हिशोब आणि ही निवड ही प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरला होता. आता या विषयावर पडदा पडून गावाचा एकी च्या दृष्टीने सर्वांनी एकत्रीत येऊन ही निवड करण्यात आली.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे दामु मोरे, व ताराचंद्र जाधव यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली. यावेळी माजी ग्रामस्थ कमिटीचे चेअरमन श्रीरंग भाश्कळ, सदस्य यशवंत जाधव जक्काप्पा मोरे, ग्राम पंचायात सदस्य संदीप अष्टेकर, बबन कांबळे, बबन जाधव, संजय अष्टेकर, नारायण चौगुले, नारायण भाश्कळ, मयूर जाधव, संजय कांबळे, तुकाराम हलकर्णीकर, मोनाप्पा भाश्कळ, कल्लाप्पा भाश्कळ, संदीप मोरे, सागर हेरेकर, बापू सुतार, राजू मोरे, बाळकृष्ण कोळीसह ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडल, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta