Friday , December 12 2025
Breaking News

एसपी डॉ. संजीव पाटील यांचा नववा फोन इन कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने घेतलेल्या 9व्या फोन-इन कार्यक्रमात शहरासह जिल्ह्यातील जनतेने फोन करून त्यांच्या समस्या मांडल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित फोन-इन कार्यक्रमात बुदरकट्टी गावातील रस्त्याच्या समस्येमुळे शासकीय शाळेत जाणाऱ्या मुलांची अडचण होत आहे. एका व्यक्तीने एसपींना फोन करून जिथे नवीन रस्ता बनवला आहे तिथे रस्त्यात खड्डे निर्माण झाल्याची तक्रार केली. एसपींनी उत्तर देत संबंधित विभागाला कळवणार असल्याचे सांगितले.

गोकाक तालुक्यात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन लोकांना धमकावत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती निर्माण झाली आहे. एका व्यक्तीने एसपींना फोन करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार केली. स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाई केली जाईल, असे एसपींनी सांगितले.

सौंदत्ती तालुक्यातील एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, माझा भाऊ त्याच्या जमिनीत पाणी वाहू देत नाही. विनाकारण त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी केली. यावर एसपी संजीव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या अखत्यारीत आल्यास ते मार्गी लावू, असे ते म्हणाले. बेळगाव हनुमान नगर येथील एका महिलेने फोन करून आमच्या पतीची दुचाकी चोरीला गेल्याचे सांगितले आणि एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ती शोधण्यासाठी विनंती केली. त्यावर उत्तर देताना एसपींनी शहर पोलिस विभागाला कळवण्यात येईल, असे सांगितले. रायबाग तालुक्यातील बावन सवदत्ती येथील एका तरुणाने फोन करून केएमएफ दुधाच्या पॅकेट मध्ये पाणी मिसळून बेकायदेशीरपणे विक्री केली जात असून तसेच ते दारूची विक्री आणि अमली पदार्थांची अवैध विक्री करत आहेत. याला त्यांनी आळा घालण्याची विनंती केली.याला एसपींनी उत्तर देत तत्काळ कारवाई केली जाईल असे सांगितले.अथणी तालुक्यातील एका व्यक्तीने फोन करून, कृष्णा नदीतून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची तक्रार केली. याला आळा घालण्यासाठी त्यांनी तक्रार केली. त्याला उत्तर देताना एसपी म्हणाले की, रात्री पोलीस बंदोबस्त तैनात करून कारवाई केली जाईल.
गोकाक तालुक्यात वाहतुकीची समस्या वाढत आहे. त्यांनी येथे वाहतूक पोलिस ठाणे स्थापन करून त्यावर नियंत्रण ठेवण्याची विनंती केली. त्याला एसपींनी प्रतिसाद देत वाहतूक पोलिस स्टेशनसाठी स्थानिकांनी अर्ज केल्यास ते सरकारकडे पाठवले जाईल, असे सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक महादेव एस. एम. शरणबसप्पा अजुर, बाळाप्पा तलवार, विठ्ठल मादार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *