बेळगाव : एका निराधार महिलेचा काल रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि त्या महिलेचे अंतिम संस्कार करण्यासाठी आमच्याकडून मदत हवी असल्याचा फोन गंगाबाई जगताप यांचा आला. लागलीच सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या सीईओ प्रेमा पाटील, कीर्ती चौगुले आणि प्रज्ञा शिंदे यांच्या मदतीने तिच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी मृतदेह शहापूर स्मशानभूमीत नेला व महानगरपालिकेच्या मोफत शेणीवर अंत्यसंस्कार करून सोपस्कार आटपले. यावेळी नरेंद्र शिंदे, अमर राजपूत व नरेंद्र बनकट्टी हे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta