बेळगाव : बेळगाव शहरातील कोनवाळ गली येथील एका रिक्षाचालकांच्या मुलीला शिक्षणासाठी हातभार लावत एंजल फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देऊ केला आहे. एंजल फाउंडेशनच्यावतीने मीनाताई बेनके यांनी सदर मुलीची शाळेची फी भरून तिच्या पुढील शिक्षणासाठी मोलाचा हातभार लावला आहे.
मुलांना शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना कोणालाही, कोणत्याही समस्या उद्भवू नयेत, या हेतूने त्यांनी इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या मुलीची थकीत असलेली फी भरली आहे. एंजल फाउंडेशनने दिलेल्या मदतीमुळे विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तसेच शिक्षकांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत. एंजल फाउंडेशनच्यावतीने सामाजिक कार्यात अग्रेसर दखल दिली जात असल्याने त्यांचे सर्वत्र करुक केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta