
बेळगाव : 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
रिंग रोड, बायपास, विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे अशा विविध प्रकल्पांच्या नावावर शेतकरी वर्गाच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाने एकीच्या बळावर लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगुंदी येथे 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्य सचिव राजेंद्र गड्यांनावर तसेच अध्यक्ष चंदगड स्वाभिमानी शेतकरी संघटना श्री. बाळाराम फडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या धर्तीवर बेळगावात म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta