Sunday , September 22 2024
Breaking News

दुचाकीस्वारांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

Spread the love
ट्रिपल सिटसह कागदपत्रांची तपासणी : दिवसभर कारवाई
निपाणी (वार्ता) : येथील शहर आणि बसवेश्वर चौक पोलिसांनी सध्या विनापरवाना दुचाकी चालविणे, कागदपत्रे नसणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, दुचाकीवरून जाताना मोबाईलवरून बोलणे, नंबर प्लेट नसणे यासह अल्पवयीन दुचाकीस्वारांविरुद्ध  येथील बस स्थानक परिसरात पुन्हा पएकदा धडक मोहीम सुरू केली. दिवसभर केलेल्या या कारवाईमध्ये अनेकांना दंड भरावा लागला.
जनजागृती करूनही शहरात अजूनही अनेक जण विनापरवाना दुचाकी चालवत आहेत. अल्पवयीन मुले, मुली तसेच युवकसुद्धा भरधाव दुचाकी चालवताना दिसत आहेत. पोलिसांनी मध्यंतरी नागरिकासह शाळा-कॉलेजमधून विद्यार्थ्यांना वाहनासंबंधी योग्य त्या सूचना दिल्या होत्या. सूचना देऊनही पाहिजे तसा परिणाम झाला नसल्याने पोलिसांनी भरधाव वाहन चालविणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध शहरात घडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. शहरातील बस स्थानक परिसर, बेळगाव नाका, कोल्हापूर वेसपरिसरात पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली आहे. या मध्ये दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या नागरिकासह अल्पवयीन विद्यार्थ्यांची संख्याअधिक आढळून आली आहे. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही जबाबदार पालक आपल्या अल्पवयीन मुलामुलींना दुचाकी वाहन चालवायला देत असल्याचे पोलिस कारवाईमध्ये दिसून येत आहे. आता मात्र अशा अल्पवयीन मुलामुलींच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात येणार आहे.
————————————————————–
मार्च एंड संपूनही कारवाई सुरू
दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटी चार ते पाच दिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात कारवाई केली जात होती. मात्र आता मार्च महिना संपूनही एप्रिल महिन्यात दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियमांचेउल्लंघन करणाऱ्या दुचाकी शहराकडून १०० रुपये दंडात्मक पावती केली जात आहे.
————————————————————–
‘वाहतुकीच्या नियमाबाबत वारंवार दुचाकी व चार चाकी वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीही वाहनधारकांनी त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दूचाकीसह चार चाकी वाहनावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.’
– आनंद कॅरकट्टी, उपनिरीक्षक, बसवेश्वर चौक पोलीस ठाणे

About Belgaum Varta

Check Also

विश्वकर्मा उद्यान लोकसह‌भागातून आदर्श बनवूया

Spread the love  नामदेव चौगुले : लोकसह‌भागातून १०० रोपांची लागवड निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *