Wednesday , December 10 2025
Breaking News

एपीएमसी व्यापारी बंधूंचा रमाकांत कोंडुसकर यांना जाहीर पाठिंबा

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील अत्यंत चुरशीने निवडणूक लढविला जाणारा मतदार संघ म्हणून दक्षिण मतदार संघाची ओळख निर्माण झाली आहे. या मतदार संघात राष्ट्रीय पक्षांना ‘टफ फाईट’ देण्यासाठी तोडीस तोड असाच उमेदवार निवडणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली दक्षिण विनसभा मतदार संघातून रमाकांत कोंडुसकर यांनी उमेदवारी मागितली असून रमाकांत कोंडुसकर यांना विविध संघ-संघटना, मतदार संघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा लाभत आहे.

आज मार्केट यार्डमधील व्यापारी बंधूनी रमाकांत कोंडुसकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उमेदवारीसाठी पाठिंबा दर्शविला आहे. रमाकांत कोंडुसकर यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी बंधूंची भेट घेत सर्वांचा आशीर्वाद घेतला.

आजवर सर्वसामान्य जनतेच्या न्यायहक्कासाठी उदार मनाने जनतेच्या पाठीशी उभं राहणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानप्रकरणी खंबीरपणे निषेध व्यक्त करणे, कारावासाची शिक्षा, एपीएमसी निवडणुकीत समिती उमेदवाराची आघाडी असूनही राष्ट्रीय पक्षांचा होणार दबाव डालवून समितीच्याच पाठीशी उभं राहणं, रेल्वेस्थानकासमोर शिवाजी महाराजांचे शिल्प उभारणे अशा अनेक गोष्टींमध्ये रमाकांत कोंडुसकर यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत निवड समितीने रमाकांत कोंडुसकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी माणिक होनगेकर, संभाजी होनगेकर, राजाराम मजूकर, अभिजित मोरबाळे, चेतन खांडेकर, विनायक पाटील, राहुल होनगेकर, मारुती चौगुले, विश्वास टुमरी, जिवन होनगेकर, सुधिर पाटील, चंद्रकांत खानोलकर, अनंत कावळे, भरतेष पाटील, कृष्णा पाटील, बसवंत माय्याणाचे, किरण जाधव, विनायक नाकाडी, टी. एस. पाटील, विनायक होनगेकर, योगेश होनगेकर, भगवान चौगुले, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; सुवर्णसौधला भाजपचा घेराव घालण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी प्रचंड निदर्शने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *