Tuesday , April 21 2026
Breaking News

भाजप स्थापना दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या 44 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून गुडशेड रोडवरील भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना किरण जाधव यांनी, ‘ मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असून देश सेवेसाठी मी कटिबद्ध आहे. प्रथम राष्ट्र ही संकल्पना माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसात भिनवण्याचे कार्य मी हाती घेतले असून भारतीय जनता पक्षाची सर्व मूल्य, कर्तव्य, निष्ठा प्रत्येक कार्यकर्त्याने अंगी बाळगावी असे यावेळी बोलताना म्हटले.
देशाप्रती त्याग, समर्पण आणि देश सेवेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी केदार घसारी, राजन जाधव, रमेश पाटील, शंकर हुलमणी, अनंत करोशी, चेतन नंदगडकर, शिवकुमार मलक्कनवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *