बेळगाव : माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पहिल्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांची आणि बेळगावच्या नवोदित कवयित्री हर्षदा सुंठणकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुक्रमे अकरा आणि दहा हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta