बेळगाव : ट्रान्समिशन टॉवर लाईन खाली पीक येत नाही असे सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांची तोंडे टॉवर लाईन खाली आलेली पिके पाहून बंद झाली आहेत. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यानी शिवारातील भात कापणी केली आणि शेतकऱ्यांना समाधारक भात पीक मिळाले., इतकेच नाही तर भाजी पीकही बऱ्यापैकी आल्याचे शेतकऱ्यांतुन सांगण्यात आले आहे..ग्रीन एनर्जी कॉरिडॉर, ट्रान्समिशन टॉवर लाईनचा शेत जमिनीवर काहीही विपरीत परिणाम होत नाही. यामुळे टॉवर लाईन खाली कडपाल म्हणजेच कड धान्य पीकही चांगले येईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ट्रान्समिशन टॉवर लाईनसंदर्भात काही अज्ञानी लोकांनी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविला होता. मात्र शेतकऱ्यांनी त्या अज्ञानी लोकांचा गैरसमज पूर्णतः खोडून टाकला आहे. ग्रीन एनर्जी कॉरिडॉर या पॉवर लाईन्स राज्य विकासाला तर पूरक तर आहेतच. शिवाय शेतकऱ्यांनादेखील लाभदायक आहेत. आज आणि भविष्यात वीज बाहेर काढण्यासाठी अथवा उत्पादित कारण्यासाठी ग्रीन एनर्जी कॉरिडॉर आवश्यक आहेत. यामुळे हा प्रकल्प लोक हितकारक असा आहे.
ज्या शेत जमिनीवर ट्रान्समिशन टॉवर उभारले जातात त्या जमिनीला योग्य मोबदला दिला जातो. शिवाय ज्या जमिनीवरून टॉवर लाईन जाते त्या जमिनीलाही योग्य दर दिला जातो. हे दर शेतकऱ्याच्या हिताचा पूर्णतः विचार करून दिले जातात. शेत जमीन मालकांसाठी हे दर पूरक आणि भरघोस असे आहेत. इतकेच नाही तर त्या जमिनीच्या सात बाऱ्यातही कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही. यामुळे जमिनीला चांगला भाव मिळतोच. शिवाय ती जमीन त्या मालकाच्या नावावरच राहते. म्हणजे जमीन मालकाचाच हक्क त्या जमिनीवर राहतो. यामुळे ट्रान्समिशन लाईन खालील जमिनीवर जमीन मालक अखंडितपणे पीक घेऊ शकतो. याचाच अर्थ केवळ जागेच्या वापरासाठी त्या शेत जमीन मालकाला समाधानकारक अशी किंमत दिली जाते.
ट्रान्समिशन लाईनसाठी उभारण्यात येणारे टॉवर आणि ट्रान्समिशन लाईन खालील जमिनीवर शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा भाजीपाला पिकवता येतो. इतकेच नाही तर कडधान्य आणि अन्य पिकेही उत्तम प्रकारे घेता येतात. नुकतीच भात कापणी झाली. शेतकऱ्यांनी मळण्याही आटोपल्या. आणि देवाच्या कृपेने नेहमीप्रमाणे प्रमाणे भात पीक आले. असे ग्रीन एनर्जी कॉरिडॉर, ट्रान्समिशन टॉवर लाईनसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta