Wednesday , March 4 2026
Breaking News

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

Spread the love

बेळगाव : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातुन अधिकृत उमेदवार म्हणून श्री. आर. एम. चौगुले यांची सर्वानुमते निवड झाली असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या मंगळवार दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कार्यालय सदाशिवनगर (लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागे) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व आजी-माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायत सदस्य, महिला आणि युवा संघटना व इतर सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि सरचिटणीस एम. जी. पाटील यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *