बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी 46 अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 74 झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी सुरु झाली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी 38 उमेदवारांनी 46 अर्ज सादर केले. त्यापैकी 44 उमेदवार पुरुष असून 2 महिला उमेदवार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta