Thursday , March 5 2026
Breaking News

समर्थ नगरमध्ये ऍड. अमर यळ्ळूरकर यांना प्रचंड पाठिंबा

Spread the love

 

‌बेळगाव : दिनांक ४ मे रोजी सायंकाळी बेळगाव शहरालगतच्या समर्थ नगर भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळूरकर यांचे प्रचार फेरी काढण्यात आले. सुरुवातीला जुना पीबी रोड येथील रेणुका मंदिर येथे देवीचे पूजन करून समर्थ नगर भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी समर्थ नगर भागातील कार्यकर्त्यांनी अमर यळूरकर यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. यावेळी महिलांनी आरती ओवाळून तसेच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून अमर यळूरकर यांचे मोठ्याने स्वागत केले. यावेळी सामर्थ महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी अमर यळूरकर यांच्या विजयाच्या घोषणा देत संपूर्ण समर्थ नगर परिसर दणाणून सोडला. संपूर्ण समर्थ नगर परिसरामध्ये यावेळी समितीचा उमेदवार निवडून आणण्याचा एकमुखी निर्धार लोकांच्या नजरेत दिसून येत होता. यावेळी आपला उमेदवार निवडून देण्याचा निर्धार समर्थ नगरवासीयांनी केल्याचे दिसून आले. या प्रचार फेरीमध्ये संयुक्त समर्थ नगर युवक मंडळ शिवजयंती युवक मंडळ, बाल शिवराय युवक मंडळ, पंचम मंडळी, सामर्थ्य महिला मंडळ, रेणुका देवी महिला मंडळ यासह इतर महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुरली जांगले, वसंत हलगेकर, संजय राऊत, बाळू किल्लेकर, संजय पाटील, महेश पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र हुलजी, संजय चतुर, मारुती कोंडुसकर तसेच राम कटारे, मंजुनाथ पालटेकर, विनायक हुलजी, सुनील सुभेदार, निखिल वराळे, राधेश शहापूरकर, पवन शिरोडकर, तसेच माजी नगरसेविका वैशाली हुलजी यांच्यासह कार्यकर्ते महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *