बेळगाव : 50 ते 60 वर्षापर्यंतच्या नागरिकांना आपले भावी जीवन सुखाने जगता यावे याकरिता बेळगावपासून 11 कि.मी. अंतरावर असलेल्या बेळगुंदी गावानजीक निसर्गरम्य वातावरण असलेल्या सुमारे साडेचार एकर जागेत 155 फ्लॅटस् तयार करण्यात येणार असून या योजनेत नागरिकांनी सहभागी होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जगजंपी बजाज उद्योग समूहाचे मालक मल्लिकार्जुन जगजंपी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.
वनरूम स्टुडिओ अपार्टमेंट अशा स्वरूपाच्या पाच मजली इमारतींच्या पाच भव्य इमारतीमध्ये 155 नागरिकांना सोय मिळवून देण्यात येणार असून 800 चौ.फूटच्या या घराला 15.55 लाख रूपये लागणार आहेत. 1 जानेवारी 2022 पासून 1 हजार अर्जांचे वाटप करून निवडकांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे.
इमारतीमध्ये राहणार्यांना सकाळी नाष्टा, फळे, दुध, दोनवेळचे सकस मोफत जेवण देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची डॉक्टरांमार्फत योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगून बेळगुंदी येथील प्रशस्त जागेत योगा हॉल, प्रार्थना व ध्यान सभागृह तसेच फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅकची सोय राहणार आहे. सध्या या ठिकाणी श्रीगणेश मंदिराचे बांधकाम सुरू असल्याचे ते म्हणाले.
’हॅपी होम’मध्ये राहणार्या नागरिकांची सोय करण्यासाठी तज्ञ व्यवस्थापक, कुशल कामगार तसेच स्वयंपाक्यांची सोय करण्यात येणार आहे.
शिवाय येथे राहणार्या नागरिकांना सुखी जीवन जगता यावे म्हणून आमच्या मातोश्री श्रीमती विमल विरभद्राप्पा जगजंपी यांच्या प्रेरणेने ही योजना आखली असल्याचे त्यांनी सांगितले.
’हॅपी होम’ योजनेसाठी केवळ एक हजार फॉर्मचे वाटप केल्यानंतर योग्य ती पाहती जाणून घेऊनच 155 कुटुंबांची निवड केली जाणार असल्याचे मल्लिकार्जुन जगजंपी यांना सांगून गोरगरिब जनतेला आणि शेतकर्याला मदत करण्यासाठी 2024 ची बेळगाव लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बजाज वाहनावर 5 हजाराची सूट
माझी मुलगी कु. निवेदिता जगजंपी ही अमेरिकेत नोकरी करीत अजून येत्या 5 डिसेंबर रोजी होणार्या तिच्या वाढदिवसानिमित्त बजाज कंपनीच्या कोणत्याही शोरूममधून वाहन खरेदी करणार्या व्यक्तीला 5 हजाराची सूट दिली जाणार असल्याने या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितलेे.
