
बेळगाव : विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार एस. एल. चौगुले यांची समितीतून हकालपट्टी करण्याचा ठराव आज झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते पास करण्यात आला.
मराठा मंदिर येथे शुक्रवारी विधानसभा निवडणुकीतील चिंतन बैठक व अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पराभवाबाबत आपली मते व्यक्त केली. दरम्यान निवडणुकीमध्ये असेल एस. एल. चौगुले, सरोजिनी चौगुले आणि अशोक चौगुले (मन्नूर) यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोपासह फोटो पुरावे म्हणून सादर केले. परिणामी याबाबत बैठकीत चर्चा करण्यात एस. एल. चौगुले यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतून हकालपट्टी करण्याचा ठराव मांडून याला सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात पास करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta