बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जून 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता ‘नाट्यमहोत्सव जून -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.
हॉटेल रामदेवच्या मागे शेख होमिओपॅथी कॉलेज समोर असलेल्या कन्नड भवन येथे या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
सदर नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी सोमवार दि. 12 जून 2023 रोजी हेमंत एदलाबादकर लिखित ‘चर्चा तर होणारच’ हा नाट्यप्रयोग होईल. दुसऱ्या दिवशी 13 जून रोजी प्राजक्त देशमुख लिखित ‘देवबाभळी’ हे नाटक, दि. 14 जून रोजी गो. पू. देशपांडे लिखित ‘उध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक, तर 15 जून रोजी सुषमा देशपांडे लिखित ‘व्हय मी सावित्रीबाई’ हे नाटक सादर केले जाईल.
शेवटच्या दिवशी शुक्रवार दि. 16 जून रोजी ‘नाट्यगीत रजनी’ कार्यक्रम सादर केला जाणार आहे.