
बेळगाव : उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमास स्वामी विवेकानंद विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक पी. के. तरळे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन हायस्कूलचे मुख्याध्यापक एल. डी. चौगुले यांनी स्वागत केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये केंद्रात प्रथम आलेली सानिका डोणकरी, द्वितीय आलेली स्नेहा चौगुले, तृतीय आदर्श कुवाडकर या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गणवेशही वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे नववी व दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर मालतीबाई साळुंखे हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक आर. डी. भांदुर्गे, माजी मुख्याध्यापक आर. आय. कोकितकर, पंडित नेहरू हायस्कूलचे माजी प्राचार्य एल. एन. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष घनश्याम जाधव, संघाचे उपाध्यक्ष भागोजी पाटील, संघाचे सचिव एल. डी. चौगुले, खजिनदार सीमाव फर्नांडिस, वाय. बी. चौगुले, शिवाजी खांडेकर, खाजा मिया संनधी, तुकाराम मेलगे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta