Monday , September 21 2026
Breaking News

राजहंसगडमध्ये सापडला फण्यावर दुर्मिळ चित्र असलेला नाग..

Spread the love

 

बेळगाव : गणपत गल्ली राजहंसगड येथील नागरिक आनंद तोवशे यांच्या घरात भर दुपारी महिलाना नाग सर्प दृष्टीस पडला. सर्पमित्र आनंद चिट्टी याना बोलाविण्यात आले त्यांनी या नागाला ताब्यात घेतले
साधारण तीन वर्षाचा या नागाच्या फण्यावरील चित्र इतर नागापेक्षा फार वेगळे आहे पण हा नाग सामान्यच आहे. नागाच्या फण्यावर असणार्‍या चित्रात बरीच तफावत असते. ग्रामीण भागात दहाचा आकडा किव्हा दोन डोळ्या प्रमाणे नक्षीकाम असल्याने त्याला द्विनेत्रांकी (specteculd cobra) नाग असे संबोधले जाते. पण हा नाग उतर भारतात आढळणार्‍या एक नेत्रांकी (monoculd) नागाशी बराच साधर्म्य साधणारा आहे. हृदय आकार दर्शविणारा असा नाग आपण पहिल्यांदाच पकडल्याचे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *