Thursday , March 5 2026
Breaking News

नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस मारुती मंदिरात साजरा

Spread the love

 

बेळगाव : “आज प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असला तरीही प्रत्येकाने नियमितपणे योग करण्याची गरज आहे त्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांपासून आपण जो योगा वर्ग इथे चालू ठेवला आहे त्यातील सातत्य पाहून कौतुक वाटते त्यासाठी श्री. कुलकर्णी सरांचे अभिनंदन” अशा शब्दात वार्ड क्रमांक 29 चे नगरसेवक श्री. नितीन जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे मराठा जागृती निर्माण संघाच्या वतीने सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासतर्फे नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून नगरसेवक नितीन जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून योग दिनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर योग गुरु एस बी कुलकर्णी यांचा हिरालाल पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर योग गुरु एस बी कुलकर्णी यांच्या हस्ते नगरसेवक नितीन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. श्रीमती एम एम कुलकर्णी मॅडम यांनी योगाचे महत्त्व विशद करताना ‘आजचे युग हे मानसिक क्रांतीचे युग आहे प्रत्येकाने वेळ आणि मन यांचे नियोजन करून रोज ठराविक वेळेत योगा केल्यास जीवनात अमुलाग्र बदल होतो त्यासाठी प्रत्येकाने योग करावा’ असे सांगितले.
याप्रसंगी शिवशंकरी नायक व मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांचीही भाषणे झाली. “इतरांना योगा शिकवीत असताना माझाही नेहमीच योगा पूर्ण होतो” असे सांगून कुलकर्णी सर यांनी समाधान व्यक्त केले. अनेक योगसाधक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाची सांगता किसन दड्डीकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *