बेळगाव : आषादी एकादशीनिमित्त यंग बेळगाव फौंडेशनच्या सदस्यांनी नंदन मक्कळ धामला भेट दिली आणि आश्रमातील मुलांना बेबी स्ट्रॉलर, स्टडी टेबल 5 किलोची तांदळाची पिशवी आदी साहित्याची मदत दिली.
त्यांनी मुलांसोबत काही वेळ घालवला आणि त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी शुभम चौगुले, सॅम्युअल रॉड्रिग्स, अद्वैत चव्हाण-पाटील, ध्रुव हंजी, कार्तिक पाटील, ओंकार बैलुकर, अमेश देसाई, आदित्य गावडे, ओंकार कांबळे, सागर शिर्के, रोहित कडगावी, ऍलन विजय मोरे आदी उपस्थित होते. फौंडेशनच्या सदस्यांनी या मदतीसाठी सतीश अनगोळकर आणि बिंद्या मॅडम यांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta