Thursday , March 5 2026
Breaking News

वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी -येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली.
काव्या कारेकर हिने स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
वाय पी नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गुरू पौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आईवडिलांसमान गुरूची महती महान आहे. गुरु इतरांना ज्ञान देऊन आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात थोरामोठ्यांचा आदर करावा, नम्रतेने वागावं, तरच सुखी जीवन जगता येईल. आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय प्राप्त करावे असे मौलिक विचार व्यक्त केले
याप्रसंगी योगा प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. ज्ञान दिल्यानं वाढते. नेहमी आपण इतरांना आनंद द्यावा, गुरू ने दिलेले ज्ञान जगायला शिकवते. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे स्पष्ट केले.
यावेळी रवींद्र हंपीहोळी, ज्योत्स्ना पोटजाळे, दत्तात्रय कुरविनकोप, विजयालक्ष्मी मायकलवार, उषा दळवी, बीना मुनोळकर, अश्विनी नाईक, शामल पाटील, गीता गोपाळराव देशपांडे, शोभा दुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी योगा वर्गातील सर्व योग प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
शेवटी आभार दत्तात्रय कुरविनकोप यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *