मराठी अध्यापक संघामार्फत 52 विद्यार्थ्यांचा सत्कार
चंदगड : “विद्यार्थ्यांनी आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा स्विकार न करता प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. कष्टाने मिळवलेले यश चिरकाल टिकते. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आयुष्याला कलाटणी देतात,” असे प्रतिपादन प्राचार्या संगीता पाटील यांनी केले कारवे येथे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणा पुरस्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. एम. गावडे होते.
यावेळी चंदगड तालुका प्रेरणा पुरस्कार श्री. राजेंद्र शिवणगेकर यांना दिला गेला. मुख्याध्यापक आर. एस. बेरड यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला नूतन प्राचार्यपदी संगीता पाटील यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यापक संघाचे अध्यक्ष रवी पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख एस. जी. साबळे यांनी केले.
मार्च २०२३मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत मराठी विषयात ९५ गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.
यावेळी एम. एन. शिवणगेकर, जी. आर. कांबळे, सुभाष बेळगावकर, सुजाता कोरवी, एस. डी. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला व्ही. एल. सुतार, एस.जे. मोहणगेकर, फिरोज मुल्ला, एम. वाय. पाटील, ए. के. पाटील, मारूती मेटकर, प्रकाश बोकडे, एन. एम. कांबळे यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. आर. पाऊसकर तर आभार बी. एन. पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta