
बेळगाव : सराफ गल्ली, शहापूर येथील मराठा पंच कमिटीतर्फे आयोजित श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक तसेच स्थापना व अभिषेक कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
सराफ गल्ली कोपऱ्यापासून काल सायंकाळी श्री मरगाई देवी मुखवट्याची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीमध्ये मराठा पंच कमिटीचे सदस्य आणि शिवप्रेमी युवक मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह सराफ गल्ली आणि शहापूर भागातील भावीक बहुसंख्येने सहभागी झाले होते. मस्तकावर मंगल कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सुहासिनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. मिरवणुकीनंतर सराफ गल्लीतील वार्ता फलकाचे उद्घाटन मराठा पंच कमिटीचे अध्यक्ष रमेश बाबुराव चौगुले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवप्रेमी युवक मंडळ, पंच कमिटीचे सदस्य व गल्लीतील नागरिक उपस्थित होते.
मिरवणुकीने आणलेल्या देवीच्या मुखवट्याची शुक्रवारी सकाळी श्री मरगाई देवी मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पूजा अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. हे सर्व विधी सौ. व श्री. विक्रांत विलास लाड आणि सौ. व श्री. महादेव कृष्णा लाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बहुसंख्य भाविक उपस्थित होते.
मराठा पंच कमिटी सराफ गल्ली शहापूरचे यावर्षीचे अध्यक्ष विलास गंगाधर लाड तर सेक्रेटरी म्हणून शंकर ताशिलदार यांची नियुक्ती करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta