बेळगाव : हजारो भाविकांच्या उपस्थितीत वडगाव मंगाई देवीची एकदिवसीय वार्षिक यात्रा उत्साहात झाली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बेळगाव शहर, उपनगरांतून भाविकांनी गर्दी केली होती. मंगाई देवस्थानचे हक्कदार चव्हाण पाटील परिवार, मनपा चव्हाण-पाटील प्रशासनाच्या नियोजनाने पोलिसांच्या बंदोबस्तात यात्रा सुरळीत पार पडली.
मंगळवारी सकाळी १० वा. धनगरी वाद्यांच्या गजरात वडगाव परिसरातील यल्लम्मा देवी, लक्ष्मी देवी, लहान मंगाई देवी, मातंगी देवी, रखुमाई देवी, पिंपळकट्ट्याजवळील गणपती – मारुती मंदिर, भरमा मंदिरात पूजन तसेच अन्य विधी करण्यात आले. यानंतर मंगाई देवी मंदिराकडे आल्यानंतर १२ वा. गाऱ्हाणे झाले त्यानंतर ओटी भरली गेली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर रंगीत कापडी स्वागत कमान उभारण्यात आली होती. वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेदरम्यान दिवसभर परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
महापौर शोभा सोमनाचे व मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंदिराला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत यात्रास्थळी गर्दी होती. रात्री स्नेहभोजनासाठी परगावाहू मोठ्या संख्येने भाविक आले होते.
Belgaum Varta Belgaum Varta