Thursday , March 5 2026
Breaking News

राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ

Spread the love

 

बेळगाव : मागील चार दिवसापासून शहर व परिसरात संततधार सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी, नाले काही प्रमाणात प्रवाहित झाले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. यावर्षी काहीशी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणू लागली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात देखील पाणी पातळीत अडीच फुटाणे वाढ झालेली आहे.
संपूर्ण बेळगाव शहराची तहान भागविणारे राकसकोप जलाशय कोरडे पडले होते. सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाणी पातळीत अडीच फुटाणे वाढ झालेली आहे. राकसकोप परिसरात आतापर्यंत एकूण 673.6 मिलिमीटर पाऊस झाल्याची मंगळवारी सकाळी नोंद झालेल्या 2453.25 फूट पाणी पातळीत 2.55 फुटाणे वाढ झाली आहे बुधवारी दिवसभरात झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळी पुन्हा वाढ झालेली आहे. 2455.80 फुटावर पाणी पातळी वाढलेली आहे. एक जुलै रोजी डेडस्टॉक मधील पाणी पातळीत 11 फुटाणे वाढ झालेली आहे. यापैकी पावणे चार फूट पाणी पातळी ही मंगळवारी सकाळपासून बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 36 तासात वाढलेली आहे. नदी, नाले मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यास फायदेशीर ठरणार आहे. जलाशय पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत आणखीन झपाट्याने वाढ होत राकसकोप जलाशय पूर्णपणे भरण्यासाठी आणखीन दमदार पावसाची आवश्यकता आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *