बेळगाव : बेळगावभर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बैलहोंगल तालुक्यातील बुदरकट्टी गावात तीन घरांची पडझड झाली असून 13 जण जखमी झाले आहेत. एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली असून जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इरय्या पत्रायणवर, शंकरप्पा आणि बसवण्णा यांची ही घरे असून, घराचे छत अचानक कोसळले.
बैलहोंगल एसी, ईओ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दोडवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta