Sunday , December 14 2025
Breaking News

दूधसागर जवळ दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

Spread the love

 

बेळगाव  : ब्रागांझा घाट सेक्शनवरील कॅसलरॉक आणि कारनझोल स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी उशिरा दरड कोसळल्याने दक्षिण पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे वेस्ट विभागाने दिली आहे.

दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत,

दुपारी कॅसलरॉकपासून तिसऱ्या बोगद्याजवळ रेल्वे रूळावर दरड कोसळली आहे. डोंगराचा भाग पूर्णपणे लोहमार्गावर आल्याने माती आणि दगड हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. खात्याकडून दरड बाजूला सारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्याला उशिर लागणार असल्याने कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. गाडी क्र. 17310 वास्को दा गामा-मंगळवारची यशवंतपूर एक्सप्रेस होती रद्द केले.

गाडी क्र. 17309 यशवंतपूर-वास्को एक्स्प्रेस मंगळवारी यशवंतपूरहून सुरू होणारा प्रवास वास्कोऐवजी हुबळी येथे थांबवण्यात आला आहे तर गाडी क्र. 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को एक्स्प्रेसने सोमवारी दिल्लीहून प्रवास सुरू केला, ती वास्कोऐवजी बेळगाव येथे थांबवली जाईल, असे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *