बेळगाव : बेळगाव येथील तनिष्का कपिल काळभैरव हिने राशी व्ही रावचा सरळ गेममध्ये सहज पराभव करून बेंगळुरू येथे कॅनरा युनियनने आयोजित केलेल्या राज्य क्रमवारीत टेबल टेनिस स्पर्धेत अंडर-13 मुलींच्या एकेरी विजेतेपदावर कब्जा केला.
बेळगाव येथील प्रशिक्षक संगम बैलूर यांच्याकडून प्रशिक्षण घेत असलेल्या तनिष्काने राशीविरुद्धच्या सामन्यात ११-६ आणि ११-५ असे वर्चस्व राखले.
बेळगावच्या आयुशी बाळकृष्ण गोडसे हिने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करत 15 वर्षा खालील गटात ब्राँज मेडल पटकावले टेनिस प्रशिक्षक संगम बैलुर यांच्या मार्गदर्शनाखाली ती देखील सराव करत असते.
Belgaum Varta Belgaum Varta