बेळगाव : मच्छे (ता. बेळगाव) येथे नगरपंचायतीसमोरच्या गावातील सोसायटीच्या जागेत ५ जुलै रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही मूर्ती सदर जागेतून हटवून मोक्याच्या आणि चांगल्या जागेत बसवण्यात यावी, अशी मागणी समस्त मच्छे गावकऱ्यांनी केली आहे. आज नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले.
मूर्ती बसवलेल्या जागेमध्ये पूर्वी सार्वजनिक शौचालय व मुतारी होती. तेव्हा अशा थोर क्रांतिवीराची मूर्ती या ठिकाणी न ठेवता ती मोक्याच्या आणि चांगल्या जागी स्थलांतरित करावी असे या निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी मच्छे देवपंच कमिटीच्या सदस्यांसह गावातील सर्व युवक व महिला मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta