Wednesday , March 4 2026
Breaking News

दुसरे रेल्वे गेट बंद; वाहन चालकांची गैरसोय

Spread the love

 

बेळगाव : रेल्वे खात्याकडून कोणतीही पूर्वसूचना न देता दुरुस्तीच्या कामासाठी टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे वाहन चालक आणि या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी सध्या रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता या पद्धतीने अचानक वाहतूक बंद झाल्यामुळे नागरिकांची विशेष करून वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीच्या कामासाठी दुसऱ्या गेटच्या पलीकडे जाण्याकरिता वाहन चालकांना पहिल्या किंवा तिसऱ्या रेल्वे गेटातून फेरा मारून जावे लागत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *