बेळगाव : गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी विविध भागातील मंडप उभारणी जागेची व मिरवणूक मार्गवर लोंबकळत असलेल्या विद्युुत तारा, संदर्भात लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सुनील जाधव यांनी मंडळ पदाधिकार्यांच्या सूचनांचा विचार हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला.
19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवात कोणतीही विद्युुत समस्या किंवा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मंगळवारी हेस्कॉमच्या प्रशासनाने नियोजनाची दिशा ठरवली.
हेस्कॉमचे अभियंता सुनील कुमार, बेळगाव उत्तरचे अभियंता अश्विन शिंदे तसेच विद्युुत वितरण, कर्मचारी व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी यांसह मंडळ पदाधिकार्यांच्या उपस्थित गणेशोत्सव मिरवणूक परिसरातून पाहणी दौरा करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta