Thursday , March 5 2026
Breaking News

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह

Spread the love

 

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त केएलईच्या येळ्ळूर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे प्रा. डॉ. सोनाली बिज्जरगी यांचे नोकरदार मातांनी स्तनपानाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल व्याख्यान झाले. तर डॉ. गितांजली तोटगी यांनी स्तनपान कसे करावे, याबद्दल माहिती दिली. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाळाला स्तनपान देण्याचे टाळू नये, असे डॉक्टरांनी सांगितले.
क्लबतर्फे हॉस्पिटलमधील नवजात शिशुंच्या मातांना खजूर, प्रोटीन पावडर व त्यांच्या बाळांसाठी कपडे देण्यात आले. एकूण ५० मातांना हे साहित्य वितरीत करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा मंजिरी पाटील यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. इव्हेंट चेअरमन डॉ. रचना शानभाग, वीणा शहा, गीता पोतदार यावेळी उपस्थित होत्या. योगिनी नाईक यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *