टिळकवाडी : वैश्यवाणी युवा संघटना, श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित आंतरशालेय गायन स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन व एम. व्ही. हेरवाडकर यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आले. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात स्पर्धा झाली.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत शहरातील एकूण १५ शाळांनी सहभाग घेतला होता. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त कर्नल भूषण हेगडे, उद्योजक कीथ मछाडो, व्यंकटेश पाटील, श्रीकांत कदम उपस्थित होते.
यावेळी ‘वैश्यवाणी’चे अध्यक्ष रोहन जवळी, संस्थानचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, महिला मंडळच्या अध्यक्षा उज्वला बैलूर व इव्हेंट चेअरमन विक्रांत कुदळे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ यासह इतर देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली.
ग्रुपमध्ये प्रथम मराठी विद्यानिकेतन, एम. व्ही. हेरवाडकर, लिटल स्कॉलर ॲकॅडमी तसेच ‘सोलो साँग’मध्ये अनुक्रमे एम. व्ही. हेरवाडकर, सेंट जोसेफ हायस्कूल व जी. जी. चिटणीस यांनी क्रमांक पटकावले. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून स्वाती हुद्दार व लक्ष्मी तिगडी यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta