बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित उचगाव सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. जवाहरराव देसाई हे होते.
श्री मळेकरणी देवी फोटो पूजन व्हा. चेअरमन श्री. अनिल पावशे यांनी केले. दीपप्रज्वलन माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, सुरेश राजूकर, चंद्रकांत देसाई, किशोर पावशे, लुमाणा पावशे, रमेश घुमटे, स्वरूपा इनामदार, ऍड. सुधीर चव्हाण यांनी केले.
सुरुवातीला दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रा. स्वरूपा इनामदार यांना साहित्यभूषण, सुनील गणपतराव चिगुळकर यांना शिक्षक भूषण पुरस्कार, विलास रामचंद्र पवार यांना सेवाभूषण पुरस्कार, मनोज पावशे यांना उचगाव भूषण पुरस्कार, तसेच बेळगांव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, सिनेअभिनेते जयवंत साळुंखे, आपत्कालीन सेवा टीमचे बसवराज हिरेमठ, कल्पना पाटील, वैभव बाडगी, वनिता बाडगी, ज्योती कोतेकर, सरिता निलजकर, राजेंद्र वेर्णेकर, सुरेश देवरमनी, ग्रामपंचायत अध्यक्षा मधुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, संजय पाटील, यल्लाप्पा पाटील, लक्ष्मी सावंत, लक्ष्मी सुतार, निवृत्त शिक्षक लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण तुडयेकर, सुखदेव कोलकर, कलाप्पा कांबळे, निवृत्त जवान संजय कुरबर, उमेश मेनसे, प्रकाश चलवेटकर, ए. आर. पाटील, उचगाव केंद्रात एसएससीला प्रथम तीन क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या प्रथम क्रमांक सानिका डोणकरी, द्वितीय नेहा चौगुले, तृतीय आदर्शा कोवाडकर, सुशांत पावशे, सारिका तंगणकर, कृतिका तंगणकर, श्रुती कदम, साईशा देसाई, सोनाक्षी पाटील, सुयश देसाई यांचा विविध स्तरावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सोसायटीचे संचालक निळखंठ कुरबर, बाळकृष्ण देसाई, कविता जाधव, पवन देसाई तसेच सभासदवर्ग, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रविणा देसाई, अजित सावंत यांनी केले तर आभार सोसायटीचे सेक्रेटरी के. एन. कदम यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta