बेळगाव : ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात जिल्ह्यामध्ये आघाडीवर असलेल्या बेळगुंदी (ता. बेळगाव) गावातील सार्वजनिक श्री गणरायाची अर्थात बेळगाव ग्रामीणच्या राजाची महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काल सोमवारी एक गाव एक गणपती असलेल्या बेळगुंदी येथील सार्वजनिक श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. त्यावेळी सध्या बेळगाव तालुक्यावर ओढवलेले दुष्काळाचे संकट दूर कर आणि शेतकऱ्यांना सुखी, समाधानी, आनंदी ठेव असे साकडे श्री गणरायाला घालण्यात आले. याप्रसंगी म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, आंबेवाडी ग्रा. पं. माजी अध्यक्ष चेतन पाटील, मारुती शिंदे, किरण मोटणकर, प्रसाद बोकडे, बेळगुंदी ग्रा. पं. सदस्य राजू किणयेकर, बेळगुंदी तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष परशराम आमरोळकर, विलास हुबळीकर, प्रल्हाद शिंदे, पुंडलिक सुतार, किशोर पाटील, रवळू शहापुरकर, चाळोबा बेटगेरीकर, महादेव पाऊसकर, दशरथ पाऊसकर आदीसह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि बहुसंख्य गणेश भक्त उपस्थित होते. महाआरती कार्यक्रमाचे औचित्य साधून बेळगुंदी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे उपस्थित मान्यवरांना ग्रामीणचा राजा प्रतिमा आणि शाल -श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.