
बेळगाव : आज शुक्रवार दि. २९ व शनिवार दि. ३० रोजी बेळगाव जिल्ह्यावरील ढगांवर रसायनांची फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यास सुरुवात झाली.
बेळगाव सांबरा विमानतळ येथे बेळगाव शुगर्सच्या माध्यमातून या प्रयोगाला चालना देण्यात आली. बेळगाव शुगर्सला नागरी विमान उड्डयन निर्देशालयाच्या महासंचालकांच्या कार्यालयाने जिल्हातील ढगांवर रसायनांची फवारणी करण्यास परवानगी दिली आहे. याप्रसंगी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, काँग्रेस नेते विनय नावलगट्टीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
आज व उद्या असे दोन दिवस दुपारी १ ते ४ पर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रक्रियेचि योजना आखली आहे. कॅप्टन वीरेंद्रसिंग आणि कॅप्टन आदर्श पांडे यांच्या नेतृत्वाखाली विटी-केसीएम विमान हे कार्यरत असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta