
येळ्ळूर : शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ठीक आठ वाजता सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर येथील सहशिक्षिका सौ. एस्. एस्. बाळेकुंद्री यांना रोटरी क्लब ऑफ बेलगाम यांच्यामार्फत नेशन बिल्डर अवार्ड तसेच शाळेच्या कन्नड शिक्षिका श्रीमती एच्. आर. अरेर यांना सरकारी मराठी शिक्षक कल्याण संघ बेळगाव ग्रामीण यांच्या मार्फत आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. याचे औचित्य साधून शाळेचे एस्.डी.एम्.सी. आणि शिक्षक यांनी या दोन शिक्षकांचा गौरव समारंभ शाळेत आयोजित केला होता. त्यामध्ये त्यांना शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
त्यावेळी शाळेच्या एस्. डी. एम्. सी. अध्यक्षा सौ. रूपा श्रीधर धामणेकर, उपाध्यक्ष श्री. ज्योतिबा यल्लाप्पा उडकेकर, श्री. ज्योतिबा शांताराम पाटील, श्री. मारुती कृष्णा यळगुकर, श्री. मधुकर फकिरा नांदुरकर, श्री. शशिकांत चांगदेव पाटील, श्री. मूर्तीकुमार श्रीराम माने, श्री. चांगदेव शिवाजी मुरकुटे, श्री. विजय चांगदेव धामणेकर, सौ. अल्का सुनील कुंडेकर, सौ. मयूरी महेश कुगजी, सौ. प्रियंका राणोजी सांबरेकर, सौ. रेश्मा पुंडलिक काकतकर, सौ. गायत्री बिर्जे, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एस् .आर. निलजकर शाळेचे सर्व सहशिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती म्हणाल्या हा सत्कार आमचा नसून संपूर्ण शाळेचा आहे. शाळेतील एस्.डी.एम्.सी., शिक्षक विद्यार्थी यांनी आम्हाला प्रोत्साहन व प्रेरणा दिली म्हणूनच आम्ही या सत्काराला पात्र झालो. या पुरस्काराने यापुढे आमची जबाबदारी वाढलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. एस्. बी. पाखरे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta