आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज; बोरगावात कीर्ती स्तंभाचा पायाभरणी
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे बोरगाव महावीर सर्कलवर कीर्तीस्तंभ उभारण्यात येत आहे. त्यासाठी जैन समाजाबरोबरच जैनेत्तर समाजही आर्थिक मदत करीत आहे. राग, द्वेष, जात,पात, बाजूला ठेवून या ठिकाणी कीर्तीस्तंभ उभारण्यासाठी येत असलेली मदत पाहिल्यास नक्कीच हा कीर्तीस्तंभ सर्व समाजात आदर्श ठरेल, असा विश्वास आचार्य श्री.१०८ कुलरत्न भूषण मुनी महाराजांनी व्यक्त केला.
बोरगाव येथील महावीर सर्कलवर रविवारी (ता.१५) दिगंबर जैन समाजातर्फे आयोजित कीर्ती स्तंभाचा पायाभरणी समारंभ १०८ आचार्य श्री कुलरत्न भूषण मुनी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.
महाराज म्हणाले, अहिंसा, विनय, सत्य, दया, त्याग या पंचतत्वांचे कीर्ती स्तंभ प्रतीक आहे. त्यामुळे सर्व समाजात धर्म व देशभक्ती जागृत होते. महावीर सर्कल भव्य असे ४१ फुटाचे कीर्तीस्तंभ उभारण्यात येत आहे. त्यामुळे देशात या शहराचा लौकिक होणार असल्याचे लौकिक होणार आहे.
प्रारंभी उत्तम पाटील यांनी, कीर्ती स्तंभ उभारण्यासाठी समस्त दिगंबर जैन समाजाने पुढाकार घेतला आहे. यासाठी शहरातील सर्वच समाजाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले, नगरसेवक शरद जंगटे , अभयकुमार मगदूम, अभय करोले, आर. बी. पाटील, महावीर पाटील, जयपाल हवले, डॉ. शंकर माळी, मारुती निकम, भाऊसाहेब पाटील, राजू मगदूम, विद्याधर अम्मान्नवर, अण्णासो बारवाडे, अशोक पाटील, बाबासो वठारे, रमेश मालगावे, जितेंद्र पाटील, टी .डी. सवाडे, बाहुबली सोभाने, रोहित पाटील, देवगोंडा पाटील, शितल अमन्नवर, सुरेंद्र पाटील, भरत हवले, अनुज हवले, राजू खिचडे, बाळासाहेब बसन्नावर, बाबू हवले, अजित तेरदाळे यांच्यासह दिगंबर जैन समाजाचे पदाधिकारी, श्रावक श्राविका उपस्थित होत्या.