बेळगाव : दसरा, दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात बेळगावात हिवाळी अधिवेशन होत आहे. हिवाळी अधिवेशन चार डिसेंबर ते 15 पर्यंत चालणार आहे. अधिवेशनाची पूर्वतयारी, अधिवेशन काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देत, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आर. हितेंद्र यांनी घेतला.
आर. हितेंद्र कालपासून दोन दिवसांच्या बेळगाव दौऱ्यावर आले आहेत. पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत त्यांनी कायदा व सुव्यवस्था, हिवाळी अधिवेशन, रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस आयुक्त एस. एम. सिद्धारामपा, पोलीस आयुक्त पी. व्ही. स्नेहा, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. अधिवेशनाची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे एडीजेपी हितेंद्र यांनी बेळगाव पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस प्रमुख विभागांची बैठक आयोजित केली आहे. त्यापैकी बेळगाव पोलीस आयुक्तालय अखत्यारीतील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत अधिवेशनासाठी सुरक्षा व्यवस्था, बंदोबस्त, रखडलेल्या विविध गुन्ह्यांचा आढावा त्यांनी घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta