बेळगाव : गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ व मराठी विद्यानिकेतन बेळगाव यांच्यावतीने आयोजित ‘महात्मा फुले पुण्यतिथी आंतरशालेय वकृत्व स्पर्धा’ मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले पुण्यतिथी साजरी केली जाते. या औचित्याने या स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी या स्पर्धेमध्ये बेळगाव ग्रामीण व शहर परिसरातील 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री. सुभाषराव ओऊळकर (अध्यक्ष ….मराठी विद्यानिकेतन बेळगाव) यांच्या उपस्थितीत पार पडले.
स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये पार पडली. प्रथम फेरीसाठी परीक्षक म्हणून श्री. बी. बी. शिंदे, श्री शिवाजी हसनेकर, श्री. सागर मरगाण्णाचे, श्री. मयूर नागेनट्टी, श्रीमती शितल बडमंजी, श्रीमती हर्षदा सुंठणकर यांनी काम पाहिले. तर दुसऱ्या आणि अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून श्री. बसवंत शहापूरकर व श्री. सी. वाय. पाटील यांनी काम पाहिले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. व्ही. सावंत, श्री. नारायण उडकेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. बी. जी. पाटील व स्पर्धाप्रमुख शैला पाटील उपस्थित होते.
स्पर्धेसाठी हे विषय होते.
*1.संत तुकाराम व महात्मा फुले यांच्या कार्यातील साम्य.
*2.खरंच संविधान धोक्यात आहे का?
*3.सामाजिक भान आणि आजचा विद्यार्थी
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
*प्रथम क्रमांक – समृद्धी गणपती पाटील (बालिका आदर्श विद्यालय, बेळगाव)
*द्वितीय क्रमांक – कुशल सोनाप्पा गोरल (मराठी विद्यानिकेतन हायस्कूल, बेळगाव)
*तृतीय क्रमांक- अथर्व निवृत्ती गुरव (मराठी विद्यानिकेतन हायस्कूल, बेळगाव)
उत्तेजनार्थ –
कुमारी नेत्राली संजय राऊत (राजश्री शाहू हायस्कूल, ओलमणी), कु. ॠग्वेद तुकाराम बेळगावकर (सरस्वती हायस्कूल, हंदिगनूर), कुमारी नम्रता लक्ष्मण कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर), कुमारी ममता सदाशिव कांबळे (सरस्वती हायस्कूल, हंदिगनूर), कु.पांडुरंग दीपक पाटील ( कुद्रेमणी हायस्कूल, कुद्रेमनी)
या सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ज्योती महाविद्यालय येथे होणाऱ्या महात्मा फुले पुण्यतिथी कार्यक्रमात बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी यशस्वी स्पर्धकांनी उपस्थित रहावे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी सीमा कंग्राळकर, स्वाती जाधव, भारती शिराळे, रेणू सुळकर, अश्विनी हलगेकर, नीता पाटील, वरदा देसाई यांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta