
बेळगाव : बेळगाव शहरात सीपीआय, एसीपी म्हणून नारायण बरमणी यांना पदोन्नती मिळाली असून त्यांना अतिरिक्त एसपी म्हणून बढती देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यात कर्तव्य पूर्ण केलेल्या बेळगाव मार्केटचे एसीपी नारायण बरमणी यांच्यासह एकूण तीन पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. नारायण बरमणी, रमण गौडा हट्टी आणि महंतेश्वर जिद्दी यांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे.
एसीपी नारायण बरमणी यांची धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून, महंतेश्वर जिद्दी यांची बागलकोटचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून, रमण गौडा हट्टी यांची विजयपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, सरकारने काल रात्री एक आदेश जारी केला.
Belgaum Varta Belgaum Varta