Thursday , March 5 2026
Breaking News

जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी मुबीन अब्दुलअजीज मुजावर यांची निवड

Spread the love

बेळगाव : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष के. अब्दुल जब्बार यांच्या मान्यतेने आणि के.पी.सी.सी. अध्यक्ष डी. के. शिवकुमार, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून बेळगाव ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी व जिल्हा ग्रामीण काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष राजा सलीम काशीमनवर यांनी मुबीन अब्दुलअजीज मुजावर यांना बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी, जिल्हा अल्पसंख्याक युनिटचे जिल्हा सचिव म्हणून नुकतेच नियुक्तीपत्र दिले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आर. हाजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *